नाशिक : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचे नशिकरोडला जल्लोषात स्वागत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात अन उत्सहात माझे स्वागत केले. नाशिकमध्ये झालेला हा आनंद भाजप कार्यकर्त्यांच्या  या आनंदाचे परिवर्तन महापालिका निवडणूकीच्या विजयात होऊन राहीलच असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केला.  नागपूर येथून रविवारी [ दि . 11 ] सकाळी बावनकुळे यांचे नाशिकरोड येथे आगमन झाले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले.

नाशिकरोड प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे येथे आगमन होताच आमदार राहूल ढिकले , आमदार सिमा हीरे , देवयानी फरांदे , शहराध्यक्ष गिरीष पालवे आदींनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले . योवळी नाशिकरोड येथील शिवाजी पुतळयाला पुष्पहार अर्पण करून बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकरोड परिसरातून बाईक रॅली काढण्यात आली . छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा , मार्ग बिटको चौक असा बाईक रॅलीचा मार्ग होता . बिटको चौकात नाशिकरोड भाजपचे कार्यकर्ते शांताराम घंटे , सचिन हांडगे , यांनी बानकुळे यांचे पुष्पहार घालून स्वागत  केले . त्यांनतर बाईक रॅली नाशिक शहराच्या दिशेने रवाना झाली . याप्रसंगी नाशिकरोड भाजपचे अध्यक्ष हेमंत गायकवाड , बाजीराव भागवत , संगीता गायकवाड , मंदा फड , अशोक सातभाई , सुनिल आडके , राजेश आढाव , प्रकाश घुगे , गिरीष जगताप , विनोद खरोटे , सुरेखा पेखळे , सुजाता गवांदे , कांचन चव्हाण , सुरेखा निकम , ज्याती चव्हाणके , किरण देशमुख , संदीप कारवाल , नितीन खोले आदी मान्यवर उपस्थित होते .

अकरा फुटी हाराचे आकर्षण
नाशिकरोड परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती . नाशिकरोड परिसरातील बाईक रॅलीच्या समारोपानंतर शांताराम घंटे , सचिन हांडगे यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा अकरा फुटी हार घालुन सत्कार केला.

नाशिकरोड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचे शहरात आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी नाशिकरोड परिसरातून काढण्यात आलेली भव्य रॅली. [ छाया उमेश देशमुख ].

हेही वाचा:

The post नाशिक : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचे नशिकरोडला जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.