नाशिक : भाजप शहराध्यक्ष पदावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा

नाशिक पालिका निवडणूक www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर भाजपात मोठे बदल करण्याचे बोलले जाते आहे. नाशिक शहराध्यक्षपदावर लवकरच नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांची नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या वर्तुळात केली जाते आहे.

नाशिक महापालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक विचारात घेता नाशिक शहर भाजपामध्ये मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. विद्यमान शहाराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या ऐवजी आमदार राहुल ढिकले यांची नियुक्ती करून पालवे यांचाही यथोचित राजकिय सन्मान ठेवत त्यांच्याकडे नव्याने मोठी जबाबदारी दिली जाईल, अशीही चर्चा भाजपात केली जात आहे. आमदार ढिकले यांच्यासोबतच माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांचेही नाव या पदासाठी आघाडीवर आहे. महापालिका निवडणुकी प्रमाणेच लोकसभा, निवडणुकीचे राजकीय गणीतेही आमदार ढिकले यांच्या निवडीमागे आखली जात असल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान ऐन वेळी धावपळ , पळापळ नको म्हणून नाशिक लोकसभा मतदार संघातील भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणुन आमदार ढिकले यांच्याकडे पाहीले जात असून भाजपाचा लोकसभेसाठीचा हा प्लॅन बी. देखील असु शकतो. अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे. थोडक्यात नाशिक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या देवळाली, सिन्नर, इगतपुरी, नशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील मराठा मतदारांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.

कसबाच्या धक्क्याने खबरदारी
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, आवश्यक त्या ठिकाणी संघटनेत बदल केले जातील. त्याच प्रतिक्रियेचा भाग म्हणून नाशिकच्या शहराध्यक्ष बदलाची चर्चा जोर लागली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : भाजप शहराध्यक्ष पदावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा appeared first on पुढारी.