नाशिक : भामट्यांनी बँकेतून लांबवले 40 हजार

Two Thousand

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा

बँक स्लीप भरून घेण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी ग्राहकाचे 40 हजार रुपये लांबविले. बुधवारी (दि.21) दुपारी सव्वाच्या सुमारास कॅम्प रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला. सागर संदीप पाटील (32, रा. कलेक्टर पट्टा) यांनी छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो त्याच्या पेढी मालकांनी दिलेला धनादेश वटविण्यासाठी सेंट्रल बँकेत गेला होता. रक्कम घेऊन तो बँकेतून बाहेर पडत असतानाच दोन अनोळखी व्यक्ती त्याच्याकडे आल्या. स्लीप भरून देण्याची विनंती केली. परंतु, अकाउंट नंबर लक्षात नसल्याची बतावणी करून एक प्लास्टिक पिशवी त्यांच्याकडे देऊन आलोच म्हणून बाहेर गेले. तेवढ्यात पाटील याने खिशातील रोकड तपासली असता ती तिथे नव्हती.

हेही वाचा:

The post नाशिक : भामट्यांनी बँकेतून लांबवले 40 हजार appeared first on पुढारी.