नाशिक : भावडबारी घाटात दरड कोसळून दगड आला रस्त्यावर, वाहतुकीला अडथळा

नाशिक (देवळा) :  भावड बारी घाटात दरड कोसळली असून, मोठा दगड रस्त्यावर आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने याची दखल घेऊन, घाटातील अडथळा दूर करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले.

बुधवारी (१३) रोजी पहाटेच्या सुमारास देवळा नाशिक राज्यमार्गावरील भावड बारी घाटात दरड कोसळण्याचा प्रकार घडला असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ,रस्त्यावर मोठा दगड येऊन पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याची संबंधित विभागाने दखल घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दयावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : भावडबारी घाटात दरड कोसळून दगड आला रस्त्यावर, वाहतुकीला अडथळा appeared first on पुढारी.