नाशिक : भिंत अंगावर कोसळल्याने महिलेचा मृत्यू

रिक्षाचालकाचा मृत्यू

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा
निफाड परिसरात सतत होत असलेला पाऊस आता गोरगरिबांच्या जीवावर उठलेला असून कोठुरे येथे सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुरुवार दि. 20 रोजी पहाटेच्या सुमारास निफाड तालुक्यातील कोठुरे येथील रहिवासी बाळासाहेब पंढरीनाथ ससाने हे पत्नीसह घरामध्ये असताना अचानकपणे घराची भिंत ढासळली. या भिंतीच्या ढिगार्‍याखाली दबून त्यांची पत्नी लताबाई ससाने (55) यांचा मृत्यू ओढवला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने जेसीबी मशीन बोलावून भिंतीचा ढिगारा बाजूला केला. मात्र लताबाई यांचे प्राण वाचू शकले नाही. ऐन दिवाळीमध्ये कुटुंबावर कोसळलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : भिंत अंगावर कोसळल्याने महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.