नाशिक : मकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

मका www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
यंदा जून महिन्यात सुरुवातीला मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. परिणामी पेरणी उशिरा झाली. काही पिके वाया गेली. उशिरा पेरणी झालेल्या मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. तालुक्यातील विठेवाडी, भऊर, खामखेडा व सावकी परिसरात मक्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. लष्कर अळी व अतिवृष्टीमुळे 20 ते 25 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजना सन 2016 पासून खरीप हंगामात लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध कंपन्यांचे जाळे कृषी विभागाने निर्माण केले आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, कीड व विविध रोगांसारख्या प्रतिकुल परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा म्हणून पीकविम्याचे संरक्षण व सुरक्षा कवच देण्यात आले आहे. त्यानुसार विठेवाडी, झिरेपिंपळ शिवारातील मका पिकाची कृषी विभाग व विमा प्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव appeared first on पुढारी.