
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मखमलाबाद कॅनाल रोडवरील प्रमोद फाल्गुने यांच्या घराजवळ निघालेला तब्बल सहा फुटांचा नाग रेस्क्यू करण्यात सर्पमित्र माणिक कुमावत यांना यश आले. हा नाग वनविभागाच्या ताब्यात दिला आहे.
फाल्गुने यांच्या घरालगत साप आढळून येताच त्यांनी सर्पमित्र कुमावत यांच्याशी संपर्क साधला. काही वेळातच कुमावत यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला रेस्क्यु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चपळता हा गुणधर्म असलेल्या नाग जातीच्या सापाने त्यांना तब्बल दोन तास हुलकावणी दिली. अखेर त्यास रेस्क्यु करण्यात कुमावत यांना यश आले. त्यानंतर सापाला वनविभागाकडे सुपूर्द केले.
दरम्यान, सोमवारी (दि.२१) सर्वत्र नागपंचमी साजरी होणार असल्याने, त्याच्या पूर्वसंध्येला निघालेल्या नागाला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
हेही वाचा :
- घरांच्या किमतीची कोटी-कोटी उड्डाणे ; विक्रीत पुणे शहर देशात दुसरे
- बदलते धोरण की धसका..!
- दसर्याच्या मुहूर्तावर एक्स्प्रेस वेवर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम
The post नाशिक : मखमलाबाद येथे सहा फुटी नागाचा रेस्क्यू appeared first on पुढारी.