नाशिक : मतदारकार्डाला अवघे ४५ टक्के आधार लिंकिंग

आधार लिंक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मतदारकार्डाला आधार लिंकिंग मोहिमेंतर्गत ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात अवघ्या १९ टक्के मतदारांनी त्यांचे आधार मतदारकार्डाला जोडल्याचे समोर आले आहे. अन्य दोन्ही मतदारसंघांत २७ टक्क्यांपर्यंत काम झाले असून, नाशिक शहराच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयाद्या शुद्धीकरण उपक्रमांतर्गत मतदारकार्ड आधारला जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही माेहीम ऐच्छिक असली, तरी अधिकाधिक मतदारांनी यात नोंदणी करावी, यासाठी जिल्हा निवडणूक शाखा प्रयत्न करीत आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात झालेले काम बघता, ही मोहीम कासवगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक ६४.२ टक्के मतदारांनी त्यांचे आधार मतदारकार्डाला जोडले आहे. त्याखालोखाल बागलाणमध्ये ५९.६, तर कळवणला ५९.२ टक्के मतदारांनी आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ग्रामीण भागात या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत असताना, नाशिक शहरातील मतदारसंघांतील आकडे उत्साहवर्धक नसल्याचे निवडणूक शाखेच्या माहितीतून समोर आले आहे.

मतदारसंघ आधारलिंक (टक्के)

इगतपुरी ६४.२, येवला ६२.८, बागलाण ५९.६, कळवण ५९.२, सिन्नर ५४.४, दिंडोरी ५२.८, नांदगाव ५१.३, चांदवड ५१.०, निफाड ५०.९, मालेगाव मध्य ४४.१, देवळाली ४२.७, मालेगाव बाह्य ३५.८, नाशिक मध्य २७.४, नाशिक पूर्व २२.६, नाशिक पश्चिम १९.३, एकूण सरासरी ४५.१

हेही वाचा :

The post नाशिक : मतदारकार्डाला अवघे ४५ टक्के आधार लिंकिंग appeared first on पुढारी.