नाशिक : मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक

नाशिक सिडको,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
उत्तमनगर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने तब्बल पाच ते सहा गाड्यांना धडक दिली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. अंबड पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले. या प्रकाराने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. परंतु पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अनिल कुवर (वय 53, रा.इंदिरानगर) हा कारचालक मद्यधुंद अवस्थेत उत्तमनगरकडून अंबड पोलीस ठाण्याकडे जात असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. सर्व दुचाकीचा अक्षरक्ष चेंदामेदा झाला. त्यानंतर कार सोमनाथ गायकवाड या फळविक्रेत्याच्या गाडीवर जाऊन आदळली. यात गायकवाड यांच्या पायावरून चाक गेल्याने त्यांचा पाय फॅक्चर झाला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात अमोल पाटील यांच्यासह एक लहान मुलगी देखील जखमी झाली आहे. त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त नागरिकांनी मद्यधुंद गाडीचालकाला चोप देत अंबड पोलिसाच्या ताब्यात दिले.

उत्तमनगरकडून शुभम पार्ककडे पर्वसरे घेऊन जात असताना सदर गाडीने मागून धडक दिली. यावेळी रिक्षात तीन प्रवासी होते. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी माझ्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
-भाऊसाहेब कुंवर, रिक्षाचालक

हेही वाचा :

The post नाशिक : मद्यधुंद चालकाची सहा वाहनांना धडक appeared first on पुढारी.