नाशिक : मध्यवर्ती कारागृहातील रजेवर गेलेला कैदी फरार 

नाशिकरोड कारागृह,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असणारा कैदी रजेवर गेला असता रजेचा कालावधी संपल्यानंतर कारागृहात पुन्हा रूजू झाला नाही. याविषयी कारागृह प्रशासनाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश कांतीलाल पंचाळ असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर गेला होता. सुट्टी 16 मे 2021 रोजी संपली. मात्र त्यानंतर तो कारागृहात पुन्हा रूजू झाला नाही. तब्बल एक वर्ष त्याचा शोध घेतला. तो कोठे ही आढळून आला नाही. त्यामुळे तो पसार झाल्याचे कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले. कर्मचारी इम्रान हमीद सय्यद यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मध्यवर्ती कारागृहातील रजेवर गेलेला कैदी फरार  appeared first on पुढारी.