
नाशिक : महानगरपालिकेच्या पश्चिम विभाग कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागाच्या वरिष्ठ लिपिक प्रेमलता प्रेमचंद कदम (54) यांना आज 500 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या नातीचा जन्माचा दाखला तयार करून देण्याकरिता कदम यांनी 500 रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलिस निरीक्षक साधना भोये बेलगावकर यांच्या पथकाने सापळा रचत कदम यांना कार्यालयातच 500 रुपये घेताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :
- नगर : अधिकारी निलंबनाविरोधात जनता रस्त्यावर
- कोल्हापुरात स्त्री शिक्षणाचा पाया रचणारी शाळा
- पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हटवा : आ सुनील टिंगरे यांनी विधानसभेत केली मागणी
The post नाशिक : मनपाची महिला लिपिक 500 रुपयाची लाच घेताना जेरबंद appeared first on पुढारी.