नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा

रामकुंड परिसरात आयुक्तांचा पाहणी दौरा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी बुधवारी (दि. २०) रामकुंड परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध अधिकाऱ्यांना गोदाघाट स्वच्छतेच्या सूचना दिल्या.

या पाहणी दरम्यान रामकुंड पार्किंग परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रेशर पाणी टॅंकरद्वारे पुरामुळे आलेला गाळ स्वछ करण्यात येत होता. तसेच रामकुंड परिसरातील मंदिरांमध्ये आलेला गाळ काढण्याचेही काम स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सुरु होते. संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याबाबत डॉ. आवेश पलोड़ संचालक यांना आयुक्तांमार्फत सूचना देण्यात आल्या. तसेच, बांधकाम विभाग उपअभियंता प्रकाश निकम यांना रामकुंड चौकातील चेम्बरजवळ उघडे पडलेले लोखंडी रॉड बंदिस्त करण्याच्या सूचना आयुक्तानी दिल्या.  जुने भाजीबाजार, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण येथील पाहणी करुन पंचवटी अमरधाम येथे विद्युतदाहिनी करिता जागेची पाहणी करण्यात आली व अमरधाममधील दुरुस्तीबाबत सबंधितांशी आयुक्तांनी चर्चा केली.

तपोवन कपिला संगम या ठिकाणी पाहणी करून संबंधित विभाग प्रमुखांना कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या. दौऱ्याप्रसंगी डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी कैलास राभडीया, उपअभियंता प्रकाश निकम, विभागीय स्वछता निरीक्षक संजय दराडे, संजय गोसावी, उदय वसावे, दीपक चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा आयुक्तांचा रामकुंड परिसरात अचानक पाहणी दौरा appeared first on पुढारी.