
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा आयुक्त स्मार्ट सिटीसंदर्भात प्रशिक्षणासाठी स्पेन येथे दौर्यावर गेले आहेत. यामुळे महापालिकेत आयुक्तच नसल्याने अधिकारी आणि कर्मचारीही गेल्या दोन दिवसांपासून मुख्यालयात जागेवर नसल्याने मनपाचे कामकाज जवळपास ठप्पच पडले आहे.
यामुळे आयुक्तांनंतर महापालिकेला कोणी वाली आहे की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या सोमवारपासून (दि.14) मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार स्पेनच्या दौर्यावर गेले आहेत. केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेत सहभागी असलेल्या शहरांमधील मनपाच्या आयुक्तांना प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. येत्या शनिवारी (दि.19) आयुक्त परतणार आहेत. त्यांच्या गैरहजेरीत प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार उपआयुक्त अर्चना तांबे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. मंगळवारी (दि.15) त्यांनी राज्यपालांच्या दौर्यात आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पूर्णवेळ हजेरी लावली. यामुळे महापालिकेत कोणीच वरिष्ठ नसल्याची संधी साधत अनेक अधिकारी आणि कर्मचार्यांनी मुख्यालयातून तसेच विभागीय कार्यालयातून काढता पाय घेत कामालाही पूर्णविराम दिला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे दहा दिवसांच्या रजेवर आहेत. त्यांच्या जागी प्रभारी म्हणून डॉ. राजेंद्र भंडारी यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुख्य लेखाधिकारी बी. जी. सोनकांबळे तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन हेदेखील पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत.
प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे-पाटील वैयक्तिक कामासाठी रजेवर आहेत. यामुळे आधीच अधिकार्यांचा दुष्काळ त्यात कोणीच वरिष्ठ नाही म्हणून इतर अधिकारी, अभियंते आणि कर्मचार्यांनीही दांडी मारत तसेच खासगी कामांना प्राधान्य दिल्याने महापालिकेत मंगळवारी (दि.15) शुकशुकाट दिसून आला.
हेही वाचा :
- युरोप-अमेरिकेत पाठदुखीमुळे अनेकांनी सोडली चक्क नोकरी!
- शिंदे गटाला दोन राज्यपालपदे; केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदेही, मुख्यमंत्र्यांची मागणी अमित शहांकडून मान्य
- पुणे : अतिक्रमणांवर हातोडा! लष्कर परिसरातील रस्ते, पदपथांवरील वीस स्टॉल्स हटवले
The post नाशिक : मनपा आयुक्त दौर्यावर.. अधिकारी मिळेना जागेवर appeared first on पुढारी.