नाशिक : मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन

मनपा कोषागार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन येथे सोमवारी (दि. 24) लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त कोषागारातील (ट्रेझरी) तिजोरीचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लक्ष्मीपूजन करण्यात आले.

मनपामध्ये दीपावलीनिमित्त कोषागार पूजनाची चांगली प्रथा असल्याचे आयुक्त म्हणाले. लक्ष्मीला प्रार्थना आहे की, मनपाची गंगाजळी सतत वाढत राहो. जेणेकरून नागरिकांना आणखी चांगल्या सुविधा देता येतील. नागरिकांचीही भरभराट होवो. शहरात सौहार्दपूर्ण वातावरण राहो. त्यामुळे शहराचा विकास वेगाने होईल, अशी भावना आयुक्तांनी व्यक्त केली.

यावेळी आयुक्तांचे बंधू श्रीकांत पुलकुंडवार, कृष्णकांत पुलकुंडवार, मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, मुख्य लेखा परीक्षक बोधिकिरण सोनकांबळे, उपमुख्य लेखाधिकारी गुलाब गावित, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, दत्तात्रेय पुंड, वाल्मीक ठाकरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन appeared first on पुढारी.