नाशिक मनपा निवडणूक : मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या प्रारूप मतदारयाद्यांवर 3,847 हरकती दाखल झाल्या असून, या हरकतींचा चौकशी अहवाल विभागीय अधिकार्‍यांकडून मनपाच्या निवडणूक शाखेकडे सादर करण्यात आलेला आहे. परंतु, छाननी आणि याद्यांमधील नावांचा ताळमेळ बसवण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी आता 21 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे याद्यांची प्रसिद्धी आणखी लांबणीवर पडली आहे.

रत्नागिरी : रोहा-चिपळूण ‘मेमू’ गणपती स्पेशल धावणार 12 डब्यांची

मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदारयाद्यांसंदर्भात प्राप्त झालेल्या हरकतींची चौकशी करण्याकरिता मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सहा विभागीय अधिकार्‍यांसह नोडल अधिकारी, पर्यवेक्षक, यादीप्रमुख, यादी सहायक अशा सुमारे अडीचशे अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक घेत 44 प्रभागांसाठी 44 पथके स्थापन केली होती. हरकतींची छाननी, प्रत्यक्ष स्थळपाहणी, पंचनामे आणि गुगल मॅपिंगचे काम सध्या पूर्ण झाले आहे. सध्या मतदारयाद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे. गेल्या 9 जुलैपर्यंत हरकतींची चौकशी करण्यासाठी मुदत होती. मात्र, हरकतींची संख्या पाहता त्यावरील छाननीची कामे वेळेत पूर्ण होणार नसल्याने मनपाने राज्य निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार 16 जुलैपर्यंत मुदत दिली होती.

त्याआधीच निवडणूक उपआयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात आला होता. परंतु, अहवाल छाननी करून त्याचा कंट्रोल चार्ट बनविण्यासाठी वेळेची गरज असल्याने मनपा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली असता आयोगाने नाशिकसह पिंपरी-चिंचवड आणि पुणे या तीन महापालिकांना अंतिम मतदारयाद्या प्रसिद्धीकरिता 21 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक मनपा निवडणूक : मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.