नाशिक मनपा प्राथमिक शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

शिक्षक मोर्चा www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक मनपा प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी मनपा प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीतर्फे नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

दत्तमंदिर रोड येथील महापालिका शाळा क्रमांक 125 येथून आमदार सुधीर तांबे, गुरुमित बग्गा, संभाजी मोरुस्कर, सलीम शेख, कविता कर्डक, प्रताप मेहरोलीया यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा आल्यावर उपसंचालक व्ही. बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. जानेवारी, फेब्रुवारी 2020, फेब्रुवारी 2021, जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीतील शिक्षकांचे वेतन अनुदान मिळालेले नाही. सेवानिवृत्त शिक्षकांना दरमहा पेन्शन, अनुदान कमी येते. 30 लोकांचा अशीकरण निधीही अद्याप दिलेला नाही. दोन वर्षांपासून महागाई भत्ता नाही. वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी फरक रक्कम देण्यात यावी. 2015 ची वैद्यकीय बिले, रजा पुरवणी बिले देण्यात यावीत, सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व सेवानिवृत्त शिक्षकांची पहिले तीन थकीत हप्ते त्वरित द्यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मोर्चामध्ये काळू बोरसे पाटील, मोतीराम पवार, सुनील खेलुकर, राजेंद्र गायकवाड, विठ्ठल नागरे, प्रकाश शेवाळे, धर्मेंद्र बागूल, राजू दातीर, ईश्वर चव्हाण, शिरीष पाडवी, पद्माकर बांगर, सगीर शेख, राजकुमार चव्हाण, पोपट घाणे, चंद्रकांत गायकवाड आदींसह सातशे-आठशे शिक्षक सहभागी झाले होते.

हेही वाचा:

The post नाशिक मनपा प्राथमिक शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा appeared first on पुढारी.