
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक मनपा शिक्षण विभागातील शिक्षकांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या वेतनासह गत आठ महिन्यांचा महागाई फरक जमा झाला आहे. तसेच जुलैचे वेतन वेतनवाढीसह जमा झाला आहे. मनसे शिक्षक संघटनेमार्फत यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आलेली होती. त्यात शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सर्व थकीत वेतन अनुदान जमा करण्याचे संघटनेला आश्वासन दिले होते. तसेच 12 सप्टेंबरच्या आंदोलनात मनसेचे नेते सलीम शेख, मनसे शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस प्रकाश सोनवणे, शहराध्यक्ष सुरेश खांडबहाले, सरचिटणीस शिवाजी शिंदे यांनी शिक्षकांच्या थकीत वेतन अनुदान व इतर कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध अनुदानाबाबत आक्रमक भूमिका मांडली होती. त्यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जुलै-ऑगस्टचे वेतन अनुदान एकत्रितरीत्या 16 तारखेपर्यंत जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. शिवाजी शिंदे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सचिव मुरकुटे यांना दूरध्वनीवरून मनपा शिक्षकांच्या थकीत वेतन अनुदानाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर शिक्षणमंत्री कार्यालयामार्फत शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्याशी संपर्क करून तत्काळ थकीत वेतन अनुदान जमा करण्यास सांगण्यात आले होते. मनपा शिक्षण विभागातील शिक्षकांचे जुलै आणि ऑगस्टचे वेतन व सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्तिवेतन जमा झाले. आता वरिष्ठ वेतनश्रेणी, फरकबिल अनुदान, वैद्यकीय बिले अनुदान, सेवानिवृत्त शिक्षकांचे उपदान अंशराशीकरण अनुदान यासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे खांडबहाले यांनी सांगितले.
हेही वाचा:
- Niira Radia tapes case | टेप लीक प्रकरणी नीरा राडिया यांना सीबीआयकडून क्लिन चीट
- सांगली : स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या बिल मसुद्याची मंजुरी रोखली; अटी, शर्तींच्या पूर्ततेनंतरच मंजुरी
- नाशिक : माझी शेती माझा सातबारा, कधी नोंदविणार पीकपेरा?
The post नाशिक : मनपा शिक्षकांचे वेतन अखेर जमा appeared first on पुढारी.