नाशिक : मनमाडला काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे संयुक्तपणे आझादी गौरव पदयात्रा

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मनमाडला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी संयुक्तपणे आजादी की गौरव पदयात्रा काढून मोफत तिरंगा वाटप करण्यात आले. शहरातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी आपल्या घरावर, दुकानावर राष्ट्रध्वज फडकवून देशाचा 75 वा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा करावा, असे आवाहन शहराध्यक्ष हाजी अफजल शेख यांनी केले

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जात असून, या निमित्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संयुक्तपणे आजादी की गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस भवनापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष हाजी अफजल शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याना हार अर्पण करत ही पदयात्रा एकात्मता चौकात आल्यानंतर येथे मोफत तिरंगा वाटप करण्यात आला यावेळी. सुभाष नहार, बाळासाहेब साळुंखे, अशोक व्यवहारे, नजिम शेख, शशिकांत व्यवहारे, नाना शिंदे, भीमराव जेजुरे, संजय निकम, इलियास पठाण, फकीर शिवदे, अॅड. जगताप, हबीब शेख, आनंद बोथरा यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : मनमाडला काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे संयुक्तपणे आझादी गौरव पदयात्रा appeared first on पुढारी.