नाशिक : मनमाडला रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरला मारहाण; हॉस्पिटलमध्ये तोडफोड

हॉस्पीटल,www.pudhari.news

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या उपचाराची कागदपत्रे मागण्याच्या वादातून रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरसोबत हुज्जत घालून त्यांना मारहाण करत हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. शहरातील गांधी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. या मारहाणीबद्दल डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशनने घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

याबाबतचे वृत्त असे की, शिवाजी चौकातील डॉ. जितेंद्र गांधी यांच्या गांधी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. चाचण्यांचा रिपोर्ट देण्याच्या मागणीवरून नातेवाइकांचे अगोदर परिचारिकेसोबत आणि नंतर डॉक्टरसोबत वाद होऊन नंतर थेट डॉक्टरला मारहाण करून हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली.

हेही वाचा :

The post नाशिक : मनमाडला रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरला मारहाण; हॉस्पिटलमध्ये तोडफोड appeared first on पुढारी.