
नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
केलेल्या कामाच्या बिलाचा चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात 36 हजार रुपये लाचेची मागणी करून शुक्रवारी (दि. 3) लाचेची रक्कम स्वीकारताना मनमाड नगर परिषदेतील दोघांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मनमाड येथील तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांच्या कन्स्ट्रक्शन फर्मचे बिल नगर परिषद कार्यालय मनमाड येथे जमा करण्यात आले होते. मात्र, मनमाड नगर परिषद कार्यालयातील लेखा विभागाचे वरिष्ठ लिपिक आनंद प्रभाकर औटी ( 46), रोखपाल संजय बबन आरोटे (52) व शिपाई नंदू पंडित म्हस्के (58) यांनी लाचेची मागणी केली. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली असता पोलिस निरीक्षक अनिल बागूल, पोलिस नाइक किरण अहिरराव, पोलिस नाईक अजय गरुड, चा. पो. ना. परशुराम जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्र पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावत कारवाई केली.
हेही वाचा :
- वडगाव शेरी : खोदाईप्रकरणी पावणेदोन कोटींचा दंड
- Gold jewellery | सोने दागिन्यांवर हॉलमार्क सहा अंकी कोड अनिवार्य, अन्यथा १ एप्रिलपासून विक्रीवर बंदी
- हिंगोली : औंढा नागनाथ विश्रामगृहासमोर 9 लाखांचा गांजा पकडला
The post नाशिक : मनमाड नगर परिषदेत तीन लाचखोरांना रंगेहाथ पकडले appeared first on पुढारी.