देवळाली कॅम्प; पुढारी वृत्तसेवा: नाशिक तालुक्यातील लहवित ग्रामपंचायतच्या कार्यालयास सकल मराठा समाजाच्या वतीने टाळे ठोकण्यात आले आहे. (Maratha Reservation Agitation )
संबंधित बातम्या
- मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप न केल्यास खासदारांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरे
- Maratha Reservation Agitation : वणी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात
- नांदेड : मराठा आंदोलनाचे रौद्ररूप; हैदराबाद राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन, वाहनांच्या रांगा
लहवित येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. या दरम्यान ग्रामपंचायतचे उपसरपंच निवृत्ती मुठाळ व सदस्य किरण गायकवाड हे दोघेच उपस्थित असल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
यावेळी शिवाजी मुठाळ, नंदू निर्मळ, पंढरीनाथ मुठाळ, दयाराम आहेर, दत्तू काळे, मुकुंद पाळदे, राकेश वारुंगसे, अजय निसाळ अंकुश काळे उपस्थित होते. (Maratha Reservation Agitation )
The post नाशिक : मराठा आरक्षणासाठी लहवित ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे appeared first on पुढारी.