नाशिक : मराठी शाळांना घरघर, पण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

शाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मराठी भाषेच्या शाळांची संख्या जरी घटली असली तरी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिकायला तयार आहेत, त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना शाळा उपलब्ध करून द्यायला हव्यात, असे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेने यामध्ये पुढाकार घ्यायला हवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा लळा लागल्यास मदत होईल.

दरम्यान, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील जवळपास 9 शाळा कमी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये सव्वा बारा हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. यामध्ये मुलांच्या संख्येत सात हजारांनी वाढ झाली आहे, तर विद्यार्थिनींच्या संख्येत सव्वापाच हजारांनी वाढ झाली आहे.

जिल्हा परिषदेने नुकताच 100 मॉडेल स्कूल करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यासाठी शिक्षकांनादेखील प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण भेटेल. यासोबतच जिल्ह्यातील शाळांमधून विद्यार्थी पुढील काळात अनेक स्पर्धा परीक्षा तसेच विविध प्रकारचे कोर्सेस घेण्यास तयार झालेले असतील, असा उद्देश जिल्हा परिषदेच्या वतीने डोळ्यासमोर ठेवून मॉडेल स्कूलची निर्मिती करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा मराठी शाळांकडे वाढता ओढा लक्षात घेऊन या शाळांसाठी आणि माय मराठीचे आपलेपण जपण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा या ग्रामीण भागात, वाडे, पाडे याठिकाणी असतात. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना माय मराठीचे इत्यंभुत शिक्षण मिळाले, तर विद्यार्थी मराठीचे गोडवे तर गातीलच त्यासोबत आपल्या गावाने जिल्ह्याचेदेखील नाव मोठे करतील.

विद्यार्थी संख्या

गट             2020-21    2021-22

बागलाण        71829            72866

चांदवड       43053       43510

देवळा           29244              29565

दिंडोरी        61422       62862

इगतपुरी        44742            46522

कळवण        40812      41866

मालेगाव         76500           78372

मालेगाव श   2725       27388

नांदगाव          52776          53581

नाशिक         38671     39355

नाशिक श 1    91203          90372

नाशिक श 2  72448      72462

निफाड             80047          81120

पेठ.              27011      27462

सिन्नर             61536          62248

सुरगाणा        39305     39595

त्र्यंबक                 36540        36671

येवला             46344     47164

हेही वाचा : 

The post नाशिक : मराठी शाळांना घरघर, पण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ appeared first on पुढारी.