नाशिक : महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त देवळा येथे बाईक रॅली

बाईक रॅली,www.pudhari.news

देवळा ; तालुक्यात आज शनिवार (दि. २८) महर्षी वाल्मीकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने समाज बांधवांनी बाईक रॅली काढली. तालुक्यातील  लोहोणेर, सावकी, वासोळ, महालपाटणे, खामखेडा, भऊर, देवळा, वाजगाव रामेश्वर या गावात महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यानिमित्ताने लोहोणेर गावात दुपारी तीन ते सहा या वेळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी लोहोणेर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार, सावकी येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष किरण निकम आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त देवळा येथे बाईक रॅली appeared first on पुढारी.