नाशिक : महात्मा फुले संस्थेचे कार्य सेवाभावी – पालकमंत्री दादा भुसे

दादा भुसे www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात स्त्री शिक्षणाला सुरुवात करून नव्या पर्वाला सुरुवात केली. त्यांचाच वारसा महात्मा फुले समाज शिक्षण संस्था नाशिकमध्ये पुढे चालवत आहे. सेवाभावी भावनेतून काम करणारी ही संस्था सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करताना दिसते. याचा मनापासून आनंद होत आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री दादा भुसे यांनी मांडले.

पखाल रोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बच्छाव, तर प्रमुख अतिथी म्हणून मेरीचे महासंचालक डॉ. संजय बेलसरे, कार्याध्यक्ष डी. डी. खैरनार, सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर, खजिनदार बाळासाहेब पुंड, चिटणीस सुनीता खैरनार, संचालिका जया बच्छाव, प्राचार्य पोपट जाधव उपस्थित होते. आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचा स्पर्श देऊन त्यांच्या स्वप्नांना आणि कृतीला बळ देण्याचे काम ही संस्था मनापासून करत आहे, असे डॉ. बेलसरे म्हणाले. विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक गोकुळ माळी यांना संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अंकुर या हस्तलिखिताचे प्रकाशन करीत वर्षभरातील विविध स्पर्धेतील यश प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वाढ विकासासाठी अनेकांचे मदतीचे हात मिळाले म्हणूनच संस्था दमदार प्रगती करू शकली, असे अध्यक्षीय मनोगतात भाऊराव बच्छाव यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : महात्मा फुले संस्थेचे कार्य सेवाभावी - पालकमंत्री दादा भुसे appeared first on पुढारी.