नाशिक महापालिकेची डॉक्टरांवरच दंडात्मक कारवाई, विनामास्क सेमिनारला आल्यानं 200 रुपयांचा दंड

<p>मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर नाशिक जिल्ह्यातलं प्रशासन देखील खडबडून जागं झालंय. मास्क न घालणाऱ्यांवर नाशिक महापालिकेच्या पथकानं धडक कारवाई सुरु केली आहे. मात्र ही कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाशिककरांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय.</p>