नाशिक महापालिकेची बनावट वेबसाईट, नागरिकाला 29 हजारांचा गंडा

<p style="text-align: justify;">नाशिकमध्ये एका नागरिकाने ड्रेनेज चेंबर संदर्भात ऑनलाईन तक्रार केली होती. त्याने ज्या वेबसाईटवर तक्रार केली ती मनपाची वेबसाईट बनावट असल्याचं समोर आलं आहे. सुरवातीला 20 रुपयांची तक्रार शुल्क आकारणी करण्यात आली, त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यातून दोन टप्प्यात 29 हजार 778 रुपये काढण्यात आले.&nbsp;</p>