नाशिक : महापालिकेचे दोन लाचखोर कर्मचारी अखेर निलंबित

निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सफाई कर्मचार्‍याकडे पाच हजार रुपयांची मागणी करणार्‍या महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातील दोन लाचखोर कर्मचार्‍यांना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अखेर निलंबित करण्याची कारवाई केली. स्वच्छता निरीक्षक राजू निरभवणे आणि बाळू जाधव अशी या कर्मचार्‍यांची नावे आहेत.

महिन्याला पाच हजार द्या आणि काम करू नका, अशा प्रकारची ऑफर संबंधित कर्मचारी सफाई कामगारांना देत असल्याचे समोर आले आहे. पाच हजार रुपयांच्या बदल्यात महिनाभराची हजेरी लावून देण्याचे आमिष दोघे कर्मचारी सफाई कामगारांना दाखवत होते. यासंदर्भात एका सफाई कर्मचार्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिकेचे दोन लाचखोर कर्मचारी अखेर निलंबित appeared first on पुढारी.