नाशिक महापालिकेतील आग लागल्याचे मुख्य कारण समोर; त्रिसदस्यीय समितीचा निष्कर्ष 

नाशिक : शुक्रवारी (ता.२२) विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या दालनाला आग लागली होती. दालनात फर्निचर, सोफासेट, पेपरचे गठ्ठे असल्याने आग पसरली. खिडकी बंद असल्याने धूर बाहेर पडण्यास जागा नव्हती. सुरक्षारक्षकांसह अग्निशमन दलाने तातडीने आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली. आयुक्त जाधव यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते.

त्रिसदस्यीय समितीचा निष्कर्ष 

गेल्या आठवड्यात महापालिका मुख्यालयातील विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. मुख्यालयाचे फायर व इलेक्ट्रिक सर्वेक्षण करण्याची शिफारस तसेच अग्निप्रतिरोध यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वीजपंप व पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्याची सूचना आयुक्त कैलास जाधव यांना सादर केलेल्या अहवालात केली आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

शॉर्टसर्किटमुळे महापालिकेला आग 
त्यासाठी शहर अभियंता घुगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, वीज विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. चौकशी अहवाल शुक्रवारी (ता.२९) सादर करण्यात आला. अहवालात शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल