नाशिक : महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

ॲक्टिव्ह सोशल संस्था www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जागतिक महिला दिनानिमित ॲक्टिव सोशल संस्था संचालित ॲक्टिव लेडीज ग्रुप आणि डॉ. पाटोले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलासाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करुण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात डॉ. प्रशांत पाटोले यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महिलांमधील रक्ताची कमतरता, थॉयरॉइड, संधिवात, मासिक पाळी त्रास, गाठी पोटाचे आजार याची माहिती व ते होणार नाही याकारिता घ्यवयाची काळजी यविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर ९६ महिलांची मोफत रक्तदाब मधुमेह यांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. दीपाली पाटोले महाले, डॉ. मेघना आहेर, सौंदर्य विशारद प्रीति खाडे, डॉ. वंदना आहेर, विश्वजीत शहाणे, विश्वास कांबरी, चंद्रशेखर पगारे आदि मान्यवर उपस्थित होते. सायली साखरे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद साखरे यांनी सूत्रसंचालन केले. माधव लोखंडे यांनी आभार मानले. यावेळी आशा महाजन, कविता चव्हाण, कल्पना निमसे, नेहा साखरे, संगीता बोढारे, समीक्षा गांगुर्दे, ज्योति टाके, अमिता जाधव, जयश्री गुंजाळ, मिना कटारे, आदिसह महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी शेखर महाजन, राकेश पगारे, विशाल साखरे, निशांत गांगुर्दे, किशोर गुंजाळ, पारस रूपवते आदिंनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post नाशिक : महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर appeared first on पुढारी.