नाशिक : महिला रुग्णाकडून परिचारिकेसह कर्मचाऱ्यास मारहाण

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा शासकीय रुग्णालयात महिला रुग्णाने परिचारिकेसह एका महिला कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना चौधरी या कर्मचारीने महिला रुग्ण कक्षातील स्वछता करण्यासाठी रुग्णाच्या नातलगांना कक्षाबाहेर जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने अंबड येथील महिला रुग्नाने मीना चौधरी व परिचारिका जाधव यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांना कळवण्यात आले असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

The post नाशिक : महिला रुग्णाकडून परिचारिकेसह कर्मचाऱ्यास मारहाण appeared first on पुढारी.