नाशिक महिला संघाला उपविजेतेपद, राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा उत्साहात

नेटबॉलस्पर्धा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खेलो मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्रतर्फे शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत नाशिक जिल्हा महिला संघाने रजतपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी निश्चित केली आहे. नाशिक नेटबॉल महिला संघ इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे या संघातील महिला खेळाडू विविध क्षेत्रांत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहे.

राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत नाशिक जिल्हा संघाच्या कर्णधारपदाची धुरा प्रज्ञा पात्रीकर यांनी उत्कृष्ट पार पाडली. या संघामध्ये कामिनी केवट, गीता कनोज, हर्षदा पाटील, हेमा सोनवणे, माधवी जाधव, चारूलता सूर्यवंशी, जयश्री भुसारे, सुनीता कनोज, दीपाली गोडसे, अनिता कनोज, कल्पना शिंदे व प्रज्ञा पात्रीकर आदींचा समावेश होता. या खेळाडूंनी अंतिम सामन्यात पुणे संघास जोरदार टक्कर दिली. मात्र, निसटत्या पराभवामुळे नाशिक महिलांना उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.

यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक सुरेखा पाटील व पोलिस क्रीडा अधिकारी अश्पाक शेख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे सचिव नंदकिशोर खैरनार व क्रीडा भारती महामंत्री संजय पाटील यांनी महिला संघाला प्रोत्साहन दिले. या खेळाडूंचे जिल्हा खेलो मास्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश पाटील, सदस्य प्रसाद शिरसाट, संदीप फुकट, अनिल वाघ, रवि मेटकर, अविनाश खैरनार आदींनी कौतुक केले.

हेही वाचा :

The post नाशिक महिला संघाला उपविजेतेपद, राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा उत्साहात appeared first on पुढारी.