नाशिक : महिलेची पोत, रोकड हिसकावून विनयभंग

विनयभंग ,www.pudhari.news

नाशिक : आर्थिक कारणावरून घरात शिरून चौघांनी मिळून दोन महिलांकडील दागिने, रोकड हिसकावून विनयभंग केल्याचा प्रकार खडकाळी परिसरात घडला. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलिस ठाण्यात अलिशान नदीम तांबोळी, मिसबाह अलिशान तांबोळी, नदीम तांबोळी (रा. भारतनगर) व तौसिफ शेख यांच्याविरोधात जबरी चोरीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.१३) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास चौघे संशयित घरी आले. संशयितांनी पीडितेच्या पतीची चौकशी करीत पैसे केव्हा देणार असे बाेलून दमदाटी, शिवीगाळ करीत पीडितेचा मोबाइल हिसकावला. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी नातलग आली असता संशयितांनी तिच्याशीही झटापट करून तिच्याकडील पोत व रोकड हिसकावली. संशयितांनी दोघींकडून ६० हजार रुपयांचा ऐवज हिसकावत विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : महिलेची पोत, रोकड हिसकावून विनयभंग appeared first on पुढारी.