नाशिक : महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांच्या दोन पोती ओरबाडल्या

नाशिक (चांदवड) : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोन्याची पट्टीपोत व दीड तोळ्याची सोन्याची शॉर्ट पोत असे तब्बल अडीच लाख रुपयांचे पाच तोळे सोने दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने ओरबाडून पळ काढला. या घटनेबाबत चांदवड पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळच्या नांदगाव तालुक्यातील बेझगाव व हल्ली ओमसाई दर्शन बिल्डिंग जुनतनगर, अंधेरी इस्ट, मुंबई येथील शालिनी नवनाथ नागरे (३०) या चांदवड-मनमाड रस्त्यावरील गंगोत्री लॉन्स येथे लग्नासाठी आल्या होत्या. लग्न आटोपून त्या रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळ्याची सोन्याची पट्टीपोत, १ लाख रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची शॉर्ट पोत असे एकूण २ लाख ५० हजार रुपयांचे पाच तोळे सोने ओरबाडून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भामट्या चोरट्याचा शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. दरम्यान, चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांच्या दोन पोती ओरबाडल्या appeared first on पुढारी.