नाशिक : महिलेला दमदाटी करून मालमत्तेचे नुकसान

महिलेला मारहाण

नाशिक : महिलेच्या मालमत्तेत विनापरवानगी शिरून एका जमावाने तिला शिवीगाळ, दमदाटी करीत तिच्या मालमत्तेचे नुकसान केले, या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या फिर्यादीनुसार संशयित रवींद्र मेघराम कनाल (65), करण रवींद्र कनाल (40, दोघे रा. देवळाली कॅम्प) यांच्यासह इतर नऊ ते दहा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी मार्च 2015 पासून महिलेस त्रास देत तिला मारहाणही केली. या प्रकरणी महिलेने न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : महिलेला दमदाटी करून मालमत्तेचे नुकसान appeared first on पुढारी.