
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बनावट कागदपत्रे तयार करून महिलेच्या जागी दुसऱ्या महिलेस हजर करून मुखत्यार पत्रावरून मालमत्ता तिघांनी बळकावत मालमत्तेवर कर्ज करून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बबली अमित सिंग (रा. आनंदवली, नाशिक, मूळ रा. भोपाळ) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दाम्पत्यासह तिघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.
बबली सिंग यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आनंदकुमार सिंग (४४), प्रीती आनंदकुमार सिंग (४२, दोघे रा. उत्तर प्रदेश), संजय प्रभाकर भडके (५१, रा. चव्हाटा, नाशिक) यांनी संगनमत करून फेब्रुवारी २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत गंडा घातला. संशयितांनी बबली यांच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून प्रीती सिंग हीच बबली सिंग असल्याचे भासवत खोटी स्वाक्षरी करीत मुखत्यार पत्र तयार करून सुमारे सहा कोटींची मालमत्ता बळकावली. त्यानंतर तिघांनी मिळून मालमत्तेवर बोजा चढवून बबली सिंग यांची आर्थिक फसवणूक करीत मानसिक त्रास दिला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- MSCI : अदानी समूहाचे शेअर्स का कोसळले?
- नेहरू एवढे महान होते, तर त्यांचे आडनाव लावायला का घाबरता? : पंतप्रधान मोदी
- Stock Market Today : बाजार घसरला, सेन्सेक्स 250 अंक तर निफ्टी 17850 च्या खाली, जाणून घ्या स्टॉक मार्केटचा आजचा मूड
The post नाशिक : महिलेला फसवलं, तिघांनी सहा कोटींची मालमत्ता बळकावली appeared first on पुढारी.