नाशिक : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेत अत्याचार

अत्याचार

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम पंडित नामक संशयिताने पीडितेसोबत फोनद्वारे संपर्क साधत शालिमार येथे बोलावून ‘माझे तुझ्यावर प्रेम असून, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे.’ असे सांगून लॉजवर नेत अत्याचार केला. त्याचे फोनमध्ये शूटिंग केले.

तसेच पांडवलेणी येथे सिंदूर लावून व मंगळसूत्र घालून लग्न केल्याचे भासवत फोटो काढले. फोटो व शूटिंग व्हायरल केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेत अत्याचार appeared first on पुढारी.