Site icon

नाशिक : ‘माकप’चे लाल वादळ विधानभवनावर धडकणार; दिंडोरीतून लाँग मार्चला सुरूवात

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार जे.पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी येथून मुंबईतील विधानभवनावर आज (दि. १२) लाँग मार्च काढण्यात आला. दिंडोरी येथील नवीन कांदा मार्केटपासून या मार्चला सुरुवात झाली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मार्चचे स्वागत तालुकाध्यक्ष अप्पा वाटणे, देविदास वाघ यांनी केले. यावेळी रस्ता रोखून रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मार्चचा पहिला मुक्काम म्हसरूळ येथे होणार आहे. या मार्चमध्ये १० हजार महिला, पुरुष सहभागी झाले आहेत.

यावेळी डॉ. डी. एल. कराड, माकपचे जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, सावळीराम पवार, मोहन जाधव, सुभाष चौधरी, उत्तम कडू, देविदास वाघ, भिका राठोड, जयराम गायकवाड, आदी मार्चचे नेतृत्व करत आहे. यावेळी पोलीस अधीक्षक शहाजी उमप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तीन तास वाहतूक ठप्प

गुजरात राज्याला जोडणारा नाशिक – सापुतारा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवार दिंडोरी बाजार व रंगपंचमी असल्यामुळे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र व सप्तश्रृंगी गड येथे येणाऱ्या भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या खालीलप्रमाणे – 

हेही वाचा 

The post नाशिक : 'माकप'चे लाल वादळ विधानभवनावर धडकणार; दिंडोरीतून लाँग मार्चला सुरूवात appeared first on पुढारी.

Exit mobile version