
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
इंदिरानगर भागातील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, सामाजिक कार्यकर्ते भूषण शिरसाट, संदीप जगझाप यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई शिवतीर्थ येथे त्यांनी मनसेत प्रवेश केला.
एकीकड़े, शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरु असताना नाशिकमध्ये मात्र भाजपला धक्का बसला आहे. कोंबडे हे मनसेतून भाजपात गेले होते, मात्र ते पुन्हा स्वगृही परतले आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी नगरसेवक सलीम शेख, माजी नगरसेवक योगेश शेवरे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर, रस्ते आस्थापन जिल्हाध्यक्ष अमित गांगुर्डे, मनोज घोडके, अनंत सांगळे, संजय देवरे, जावेद शेख, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, योगेश लभडे, भाऊसाहेब निमसे, नितीन माळी, संतोष कोरडे, सचिन सिन्हा, जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील, मनोज गोवर्धने, गणेश मंडलिक, रोहन जगताप, अक्षय कोंबडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
- असे फोटो टाकत राहिलीस तर चायना आणि कोरियाचीपण नॅशनल क्रश होशील
- कोल्हापूर : खेरीवडे फाट्याजवळ पिकअपची एसटी बसला धडक; ७ जण जखमी
- विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तुफान राडा
The post नाशिक : माजी नगरसेवक सुदाम कोंबडे स्वगृही, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश appeared first on पुढारी.