नाशिक : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी यशवंत भूमिपुत्रांचा नागरी सत्कार

मालेगाव www.pudhari.news

नाशिक (मालेगाव)  : पुढारी वृत्तसेवा
सुमंगल ग्रुप ऑफ कंपनीच्या शिवतीर्थ अ‍ॅग्रो फीड्स या चौथ्या नवीन प्रकल्पाचे (पोल्ट्री पॅलेटेड अ‍ॅण्ड क्रम्ब्स् फीड) उद्घाटन येत्या 5 मार्चला सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या समारंभातच नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील यशवंत भूमिपुत्रांचा नागरी सत्कार माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सुमंगल कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रावळगाव रस्त्यावरील या कंपनीत झालेल्या या पत्रकार परिषदेला बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे आदी उपस्थित होते. संजय हिरे यांनी प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले. शेती आणि कृषिपूरक क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यास बळीराजा, कामगार व मालेगाव पंचक्रोशीतील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे सहकार्य लाभल्याने एका तपात चौथा प्रकल्प उभा राहून कार्यरत होत असल्याचा आनंद आहे. बंडूकाका बच्छाव यांनी, संजय हिरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत वार्षिक किमान एक हजार कोटींच्या उलाढालीपर्यंत उभ्या केलेल्या उद्योगविश्वाची माहिती दिली.

या भूमिपुत्रांचा होणार सन्मान…
पालकमंत्री दादा भुसे, आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रतापराव दिघावकर, आमदार सीमा हिरे, नामको बँकेचे अध्यक्ष वसंत गिते, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, संचालक आर. के. बच्छाव, दिलीप दळवी, बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव, विशेष सरकारी वकील अ‍ॅडव्होकेट शिशिर हिरे, सह्याद्री अ‍ॅग्रोचे अध्यक्ष विलास शिंदे, आनंद उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्धव आहेर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. राहुल शिंदे, नीलिमा पाटील, रावळगावचे सरपंच महेश पवार, आधार खुर्द सोसायटीचे अध्यक्ष नवल मोरे, येसगावचे सरपंच सुरेश शेलार, दाभाडीचे सरपंच प्रमोद निकम.

हेही वाचा :

The post नाशिक : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी यशवंत भूमिपुत्रांचा नागरी सत्कार appeared first on पुढारी.