Site icon

नाशिक : माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर विधानसभा मतदारसंघात अर्थसंकल्पीय अधिवेशनात 24 कोटी 32 लाख रुपयांच्या रस्त्यांना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. यातून 12 रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी आमदार कोकाटे यांनी निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये ओझर-शिर्डी राज्यमार्ग 35 च्या 34 ते 44 किमी व 55 ते 58 किमीसाठी 5 कोटी 50 लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग 50 ते चास कारवाडी ते राज्यमार्ग 32 ला जोडणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग किमी 0 ते 2 साठी 1 कोटी रुपये, सोमठाणे, पंचाळे, दोडी, ठाणगाव प्रमुख जिल्हा मार्गासाठी 17 ते 25 किमीच्या सुधारणेसाठी 5 कोटी रुपये, टाकेद गटातील इंदोरे ते खडकेद रस्ता 102 ते 104 किमीसाठी 1 कोटी रुपये, पांगरी, शहा, उजणी, रामपूर, वडांगळी, गुळवंच, मुसळगाव या रस्त्याच्या 14 ते 24 किमीसाठी 4 कोटी रुपये, गोंदे, दापूर व चापडगाव या रस्त्याचे 2 ते 6 किमी व 18 ते 18.300 किमीसाठी 3 कोटी रुपये, भंडारदारवाडी, निनावी, साकूरफाटा 7.500 ते 8.500 किमीसाठी 2 कोटी रुपये, धामणगाव ते अडसरे बु. व अडसरे शिव टाकेद रस्ता 1 कोटी 20 लाख रुपये, शेणित ते जाधव वस्ती रस्ता 60 लाख, धामणी ते प्रमुख राज्य मार्ग 12 ते बोराची वाडी यासाठी 30 लाख, धामणी जोड ते प्रमुख राज्यमार्ग 12 साठी 90 लाख निधी मंजूर झाला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी appeared first on पुढारी.

Exit mobile version