नाशिक : माध्यमिक शिक्षकांना आता दरमहा एक तारखेलाच वेतन

शिक्षकांना दरमहा एक तारखेलाच वेतन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचार्‍यांचे वेतन आता थेट बँक खात्यात दरमहिन्याच्या पहिल्या दिवशी वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षण आयुक्त, उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, वेतन पथक आणि आयडीबीआय बँकेच्या संयुक्त प्रयत्नातून सेवा हमी कायद्याचे पालन करण्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे.

जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळातील कर्मचार्‍यांना वर्षानुवर्षे वेळेवर वेतन होण्याची मागणी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने करण्यात येत होती. शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांनी सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्याने या योजनेला गती मिळाली. शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे, नाशिक विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, वेतन पथक अधीक्षक उदय देवरे आणि आयडीबीआय बँकेच्या मुख्य शाखेतील अधिकारीवर्गाने थेट वेतन अदा करण्याची प्रक्रियेचा कृती कार्यक्रम निश्चित करून वेगवान हालचाली केल्याने ऑगस्ट महिन्याचे वेतन जिल्ह्यातील कर्मचार्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

महिन्याच्या पहिल्या तारखेला तेही थेट कर्मचार्‍याच्या वैयक्तिक खात्यावर वेतन रक्कम वर्ग झाल्याने खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील कर्मचारी सुखावले आहेत. यापुढे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक खात्यावर वेतन अदा करताना मुख्याध्यापकांच्या विवरण पत्राशिवाय शाखानिहाय पगाराची रक्कम होणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : माध्यमिक शिक्षकांना आता दरमहा एक तारखेलाच वेतन appeared first on पुढारी.