नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार

nimgav www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
प्रत्येक नागरिकाला स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मानवतेच्या द़ृष्टिकोनातून नागरिकांना दर्जेदार सुविधांचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार सुहास कांदे, सरपंच सरला जगताप, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर आदींनी उपस्थिती लावली. सुमारे पाच कोटींच्या निधीतून या आरोग्य केंद्राची इमारत साकारण्यात आली आहे. तिच्या माध्यमातून 13 गावांना आरोग्य सुविधा मिळणार असून, 27 प्रकारच्या चाचण्या मोफत होऊन 75 प्रकारची औषधे येथे मिळतील. रुग्णांचा खासगी रुग्णालयांमध्ये होणारा खर्च कमी व्हावा, यासाठी आरोग्य विभागाने काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी, असे मंत्री डॉ. पवार यांनी सांगितले. सोलर सिस्टीममुळे विजेची बचत होऊन आरोग्य केंद्रांना अखंडित वीजपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, दूरद़ृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना सार्वजनिक मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जनतेला आरोग्याच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी व आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार appeared first on पुढारी.