नाशिक : मानोरीत आजपासून तीन दिवसीय कीर्तन महोत्सव

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील मानोरी येथील साईदर्शन युवा मंचाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार (दि. 25) पासून तीन दिवसीय कीर्तन महोत्सव, सांस्कृतिक तसेच पारितोषिक वितरण सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत साईबाबांची महाआरती व बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. त्यानंतर गायिका कोमल पाटोळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि. 26) सायंकाळी 5 वाजता गावातून साईबाबांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गावातील आबालवृद्ध, महिला व युवक-युवती सहभागी होणार आहेत. गुरुवारी (दि. 27) सकाळी 7 ला श्री क्षेत्र मानोरी ते शिर्डी पायी दिंडी प्रस्थान होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन साईदर्शन युवा मंचच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मानोरीत आजपासून तीन दिवसीय कीर्तन महोत्सव appeared first on पुढारी.