
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मे महिन्यात शहरातील एका महिलेने मुलीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराजवळ राहणार्या युवकाविरोधात मायलेकीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने मायलेकीस ब्लॅकमेल करीत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी व मुलीसह राहत होते. मायलेकीने मे महिन्यात आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुरुवातीस आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याबाबत तपास सुरू असताना मृत महिलेच्या पतीने महिनाभरानंतर देवळाली कॅम्प पोलिसांकडे फिर्याद देत घराजवळ राहणार्या 30 वर्षीय युवकामुळे पत्नी व मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले. संशयित युवकाने सुरुवातीस पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवत तिचे अश्लील छायाचित्र काढले. या छायाचित्रांच्या आधारे त्याने पत्नीला मानसिक त्रास देत मुलीसोबतही शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून पत्नीस ब्लॅकमेलिंग सुरू केले. युवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर मायलेकींनी आत्महत्या केली होती. घटनेनंतर पतीस मानसिक धक्का बसल्याने त्यांनी फिर्याद दाखल केली नव्हती. अखेर मंगळवारी (दि. 5) त्यांनी पोलिसांकडे संशयिताविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :
- आ. तानाजी सावंत यांनाच पालकमंत्री करा
- पंढरपूरसाठी विकास आराखडा तयार करणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
- हजारो हातांनी उचलला अनेक टन कचरा
The post नाशिक : मायलेकीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.