नाशिक : मार्कंडेय पर्वतावरुन दगड अंगावर पडल्याने दोन भाविक जखमी

मार्कंडेय पर्वत दगड कोसळून दोन जखमी

 वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

वणी – सप्तशृंगगडालगत असलेल्या मार्कंडेय पर्वतावरुन तळाच्या भागालगत बसलेल्या दोन इसमांच्या अंगावर दगड पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सोमवती अमावस्ये निमित्ताने रविवारी रात्री पासूनच अनेक भाविक मार्कंडेय पर्वतावर मुक्कामी गेले. तर सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी पर्वतावर झाली.

सप्तशतीचे पाठ भगवतीला मार्कंडेय ऋषी यांनी सप्तशृंगीला या ठिकाणी सांगितले असल्याची आख्यायिका आहे.  त्यामुळे या स्थानाची महत्ती असल्याने महाराष्ट्र व गुजरात राज्याबरोबर इतर राज्यातील भाविक मार्कंडेय ऋषींच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी येतात व नवस फेडून कृतकृत्यता अनुभवतात. दरम्यान बाळु गजराम चारोस्कर वय 57, रा.तळेगाव दिंडोरी व अशोक मनोहर गायकवाड रा, नाशिक हे दोघे भाविक पर्वत चढत असताना ते थकले व दम लागल्याने विश्रांती घेण्यासाठी तळालगतच्या भागात बसले असताना अचानक व अनपेक्षित पर्वतावरुन भला मोठा दगड आला व या दोघांच्या अंगावर पडला. दगड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या भाविकांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पावासामुळे पर्वतावरील दगडाखालील माती ओली झाल्याने सदर दगड पर्वतावरुन कोसळल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरवर्षी वर्षातून दोन किव्हा तीन वेळा सोमवाती अमावस्या येत असते. त्या निमित्ताने राज्य भरातून तसेच इतर राज्यांमधून देखील दोन ते तीन लाख भाविक भक्त यात्रेसाठी येतात. परंतु अति दुर्गम ग्रामीण भाग असल्यामुळे येथे पार्किंग सुविधेअभावी पाच ते सहा किलोमीटर गाड्यांची लांब रांग लागते तसेच कुठे पण रस्त्यात गाडी लावावी लागते व वरती डोंगराच्या पायथ्याशी जाण्यास लोकांना चार ते पाच किलोमीटर पायी चालावे लागते व मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनास विनंती आहे की, हे क्षेत्र परिपूर्ण रित्या पर्यटन स्थळ घोषित करावे व पार्किंगची वेवस्था करावी अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो.
केशव भोये
समाजिक कार्यकर्ते – मुळाणे

हेही वाचा : 

The post नाशिक : मार्कंडेय पर्वतावरुन दगड अंगावर पडल्याने दोन भाविक जखमी appeared first on पुढारी.