नाशिक : मिनी बस पलटल्याने 13 प्रवासी जखमी

त्र्यंबकेश्वर www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबक) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची मिनी बस पलटी झाल्याची घटना घडली असून 29 पैकी 13 प्रवासी जखमी झाले आहेत.  ब्रम्हगिरी वरून दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी पुढील प्रवासासाठी प्रारंभ केला. बसमध्ये प्रवास सुरु झाल्यापासून प्रवासामध्ये उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल जवळ पर्यटन केंद्र येथे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस थेट नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला धडकली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, जखमी भाविकांची अवस्था गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मिनी बस पलटल्याने 13 प्रवासी जखमी appeared first on पुढारी.