नाशिक : मिशन रेबीज शिबिरांंतर्गत लंडन येथून आलेल्या मोबाइल हॉस्पिटलचा भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ

रेबीज मोबाईल हॉस्पीटल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना वर्ल्ड वाइड वेटनरी सर्व्हिस व मिशन रेबीज तथा आवास यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचा लंडन येथून आलेल्या मोबाइल हॉस्पिटलचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, गौरव क्षत्रिय, अमोल महाले, नाना पवार, अमर वझरे, अमोल नाईक, मकरंद सोमवंशी, प्रा. ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मोबाइल हॉस्पिटल शहरातील विविध भागांमध्ये जाऊन शहरातील जनतेचे प्रबोधन करेल. संस्थेचे डॉक्टर व कर्मचारी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन रस्त्यातील भटकी कुत्रे पकडून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणार आहे. या उपक्रमासाठी भुजबळ यांनी शुभेच्छा देताना शहर व जिल्ह्यात हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन त्यांनी संस्थेच्या पदाधिकार्‍यांना केले.

हेही वाचा:

The post नाशिक : मिशन रेबीज शिबिरांंतर्गत लंडन येथून आलेल्या मोबाइल हॉस्पिटलचा भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ appeared first on पुढारी.