
नाशिक : पुढारी ऑनलाइन
३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना दिला. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असेही भुजबळ यावेळी म्हणाले. छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडनी करत फैलावर घेतले.
यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंखे, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास १ नोव्हेंबर पासून टोल बंद करण्याचा इशारा दिला.
हेही वाचा :
- नाशिक : शाळा बंद विरोधात एकवटल्या संघटना
- नाशिक : ड्रोन जमा करण्यास ३० पर्यंत मुदतवाढ, कॅटस्-डीआरडीओतील हेरगिरीनंतर ड्रोनबंदी
- Defence Expo 2022 : ‘डिफेन्स एक्स्पो’च्या माध्यमातून भारताच्या व्यवसाय कौशल्यांवर जगाचा विश्वास दृढ होईल; पंतप्रधान नरेद्र मोदी
The post नाशिक- मुंबईमहामार्गाच्या दुरावस्थेवरून छगन भुजबळ आक्रमक appeared first on पुढारी.