नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार

ट्रक पेटला,www.pudhari.news

नाशिक, इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
मुंबई आग्रा महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी द बर्निंग ट्रकचा थरार पाहावयास मिळाला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक डी. डी. ०१ एच. ९४९९ या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.

आठवा मैल येथील निर्मळ आश्रमाजवळ या चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याच्या घटनेने माहामार्गावर खळबळ पसरली. मात्र ट्रकच्या चालकाने प्रसंगावधान राखत खाली उडी मारल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेत बघता बघता पूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

महामार्ग पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या नंतर आग विझवण्यात आली. यामुळे मुंबई आग्रा महामार्गाची वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती. तर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. या ट्रकमध्ये शाबुदाणे असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार appeared first on पुढारी.