नाशिक : मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी

MURDER

नांदगाव /जातेगाव (जि. नाशिक) : वेडसर असलेल्या मुलाची थेट जन्मदात्या आईनेच सुपारी देत खून केल्याची घटना ढेकू, खुर्द (ता. नांदगाव) येथे घडली. या प्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जनाबाई आप्पा पेंढरे, रा. ढेकू खुर्द या जन्मदात्या आईने मुलगा जनार्दन आप्पा पेंढरे (47) यास जिवे ठार मारण्यासाठी 15 हजारांची सुपारी दिली. त्या कटानुसार संशयित मारेकरी समाधान दौलत भड (रा. पळासी,  ता. नांदगाव) याने लोखंडी पहारीच्या सहाय्याने जनार्दन याच्या डोक्यावर वार करून ठार केले व एका प्लास्टिक गोणीत प्रेत घालून ते ढेकू खुर्द येथील साईनाथ राठोड यांच्या शेतातील विहिरीत टाकून दिले.

दरम्यान, गुरुवारी (दि.7) घटनेची माहिती पोलिसांना कळताच सहायक पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, पोलिस निरीक्षक रामेश्वर राठोड, पोलिस उपनिरीक्षक वाघमारे यांनी धाव घेत तपास करून घटनेच्या काही तासांतच मारेकर्‍यासह आईला जेरबंद केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी appeared first on पुढारी.